कोरेगाव भीमा शौर्यदिन : 77 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ५३० व्हॉट्सअप गृप अ‍ॅडमिनलाही  नोटिसा

Prohibitive action against 77 people notice to 530 WhatsApp group admins
Prohibitive action against 77 people notice to 530 WhatsApp group admins

कोरेगाव भीमा(पुणे) : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार शिरुर हवेलीमधील यापुर्वी गुन्हे दाखल असलेल्या ७७ जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे आदेश प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत. तर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाईच्या नोटिसाही शिरुर-हवेलीतील ५३० व्हॉट्सअप गृप अ‍ॅडमिनला पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.  

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) नुसार अभिवादन कार्यक्रम परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी यापुर्वी गुन्हे दाखल असलेल्या ७७ जणांना ३० डिसेंबर ते २ जानेवारीला सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाईचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहे.

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास व्हॉट्सअप गृप अ‍ॅडमिनवरही होणार कारवाई, ५३० गृप अ‍ॅडमिनला बजावल्या नोटिसा

दरम्यान १ जानेवारीच्या अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलिसांचे प्रत्येक बाबींवर बारवाईने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपवर समाज विघातक, आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर, व्हिडिओ पोस्ट टाकून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ग्रुपवरही पोलिसांचे बारीक लक्ष असून संबंधित अँडमिनवरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२० ग्रुप तर लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४१० गुप अँडमिनला पोलिसांकडून लेखी नोटिसाही बजावल्या असून त्यांनी ग्पवर बारकाईने लक्ष ठेवण्यासह योग्य ती काळजी घेण्यांच्या सुचनाही शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर व लोंणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी  संबंधित अँडमिनला दिल्या आहेत.

या दरम्यान ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास गुप अँडमिनलाच जबाबदार धरुन अटकेची कारवाई करण्यात येणार असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांची शिक्षाही होवू शकते. यामुळे गुप अँडमिनने सावधान राहण्याच्या सूचना ५३० गृप अ‍ॅडमिनला दिल्या आहेत. त्यामुळे आता गृप अ‍ॅडमिनची जबाबदारी वाढली असून त्यांना ग्रुपच्या पोस्टवर बारीक लक्ष ठेवावे लागणार असून शक्य असल्यास गृपला अ‍ॅडमिन सेटींगनुसार पोस्टचे नियंत्रणही करावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com