आव्हानांवर मात करतोय चित्ता स्थिरावतोय

आव्हानांवर मात करतोय चित्ता स्थिरावतोय
Published on

शेओपूर (मध्य प्रदेश),ता. १७ ः देशातून नामशेष झालेल्या चित्त्याचे पुन्हा संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्राने हाती घेतलेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’या महत्वाकांक्षी प्रकल्पाला यश मिळताना दिसत आहे. चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रकल्पाअंतर्गत आव्हानांवर मात करत चित्ता देशात स्थिरावत असल्याचे सुखद चित्र आहे. चित्त्यांची एकूण संख्या ५२ वर गेली असून यात देशातच जन्मलेल्या ३२ चित्त्यांचाही समावेश आहे. ‘प्रोजेक्ट चित्ता’च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त परदेशातून चित्ते आणून त्यांचे संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना अधिकाऱ्यांनी उजाळा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यातील बंदिस्त अधिवासात सोडण्यात आले होते. चित्यांसाठी योग्य अधिवासाचा विस्तार व देशात दीर्घकाळासाठी चित्त्यांची संख्या वाढविणे ही या प्रकल्पाची पुढील उद्दिष्टे आहेत. जगातील सर्वांत वेगवान प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्त्यांची भारतातील संख्या आता ५२ वर पोचली असून यातील ३२ चित्त्यांचा जन्म भारतातच झाला आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, परदेशातून भारतात चित्ते आणल्यानंतर अडचणींपासून धडे गिरवीत चित्त्यांचे संवर्धन व त्यांची संख्या वाढविण्यात यश आले. चार वर्षांत त्यांना चित्त्यांचे वर्तन, आरोग्य आणि भारतीय वातावरणाचा ते कसा स्वीकार करतात, याबाबत अधिकाऱ्यांना शिकायला मिळाले.
नामिबियातून आणलेले आठपैकी तीन चित्ते जिवंत असून भारतात जन्मलेल्या २२ बछड्यांमुळे एकूण चित्ते २५ वर गेले आहेत. त्याचप्रमाणे,दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या १२ चित्त्यांपैकी आठ जिवंत असून दहा बछड्यांच्या जन्मामुळे या देशाशी संबंधित चित्ते १८ झाले आहेत. या वर्षी फेब्रुवारीत बोस्तवानातून नऊ चित्ते आणल्याने या प्रकल्पाला आणखी बळ मिळाले आहे.

प्रकल्पाचे टप्पे

पहिले वर्ष
- अधिकाऱ्यांच्या पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला
दुसरे वर्ष
- चित्त्यांचे अस्तित्व टिकवित त्यांचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
तिसरे वर्ष
- चित्त्यांना जंगलातील खुल्या वातावरणात सोडले. यावेळी १२ जिल्ह्यांत पसरलेल्या आंतरराज्यीय भूप्रदेशावर दिवसाचे २४ तास चित्त्यांवर लक्ष ठेवण्यात आले.
चौथे वर्ष
- चित्त्यांच्या प्रजननक्षम माद्यांचे स्थिरावणे व दुसऱ्या पिढीतील चित्त्यांच्या बछड्यांचे अस्तित्व टिकविण्यावर भर देण्यात आला.

चित्त्यांची संख्या

कुनो राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश)
४९

गांधीसागर अभयारण्य (मध्य प्रदेश)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com