Babasaheb Patil News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
Rural Economy India : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पुणे येथे देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाचे उद्घाटन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडले.
Babasaheb Patil on Role of Desi Cow in Rural Developmentesakal
पुणे : ‘‘देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक आहे. देशी गोवंशाचे संवर्धन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारे एक प्रभावी पाऊल आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.