
खडकवासला धरण १०० टक्के भरलेली. गुरुवारी रात्री पाऊस होता. कोकण घाटमाथ्यावर जोदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती.
खडकवासला - धरण १०० टक्के भरलेली. गुरुवारी रात्री पाऊस होता. कोकण घाटमाथ्यावर जोदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यामुळे शुक्रवारी सकाळीच चार हि धरणातील पावसाचा, त्यामुळे वाढणाऱ्या पाण्याचा योग्य अंदाज घेतला. धरण १०० टक्के भरून ठेऊन जास्तीत जास्त विसर्ग सोडला. दुपारी एक वाजता ३० हजार ६७७ क्युसेक पाणी सोडले. ते पुन्हा वाढविण्याची गरज भासली नाही. नाहीतर हा विसर्ग ५० क्युसेक पर्यंत वाढला असता आणि शहरात पुराचा परिणाम जाणवला असता.
याचे योग्य नियोजन अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, सहायक अभियंता योगेश भंडलकर, खडकवासल्याचे शाखा अभियंता सुभाष शिंदे, पानशेत, वरसगावचे शाखा अभियंता अनुराग मारके व सहाय्यक शाखा अभियंता दत्तात्रय कापसे व त्याचे सर्व सहकारी यांनी योग्य नियोजन केले. त्यामुळे पूर स्थिती जाणवली नाही.
चारहि धरण १५ ऑगस्ट दरम्यान १०० टक्के भरली होती. त्यानंतर मागील महिनाभरात खडकवासला व टेमघर धरण ९६ ते ९८ टक्के पाणीसाठा पर्यत कमी झाला होता. चार दिवसाच्या पावसाने धरण पुन्हा १०० टक्के भरली. पाऊस कमी झाल्याने खडकवासला धरणातील विसर्ग गुरुवारी रात्री ६ हजार ८४८ क्युसेक पर्यंत कमी केला. गुरुवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला.
म्हणून वरसगावमधून शुक्रवारी सकाळी सात वाजता पाच हजार ०१० क्युसेकचा विसर्ग वाढवला. त्यामुळे, खडकवासल्यातील सहा हजार ८४८ क्युसेक असणारा विसर्ग सकाळी सात वाजता १० हजार २४६ क्यूसेक केला. पानशेतमधून दोन हजार ६०४ क्यूसेक विसर्ग वाढवून सकाळी आठ वाजता एकूण चार हजार ५५८ क्युसेक वाढवला.
अशा प्रकारे पानशेत व वरसगावचा विसर्ग वाढत गेला. खडकवासला धरणाचा विसर्ग आठ वाजता १० हजार २४६, नऊ वाजता १५ हजार २११, सकाळी १० वाजता १७ हजार ६७१, ११ वाजता १९ हजार २८९ केला आहे. बारा वाजता २२ हजार ८८० सुरु होता.
त्यावेळी पानशेतचा एकूण विसर्ग १२ हजार ०६२ आणि वरसगावचा एकूण विसर्ग सात हजार ४६४ असा एकूण १९ हजार ५२६ क्युसेक, टेमघरमधून ९११ असे क्युसेक असे मिळून खडकवासला धरणात २० हजार ४३७ क्युसेक पाणी थेट जमा होत होते. त्यावेळी खडकवासला धरणात १० हजार क्युसेकचा येवा होता. म्हणून त्यावेळी, खडकवासला धरणातील विसर्ग २२ हजार ८८० वरून दुपारी एक वाजता ३० हजार ६७७ क्युसेक केला.
यंदाचा सर्वाधिक विसर्ग
विसर्ग आज दुपारी एक वाजता ३० हजार ६७७ क्युसेक केला. रात्री नऊ वाजेपर्यत तोच कायम होता. त्यावेळी तो खडकवासला धरणातील विसर्ग यंदाचा सर्वाधिक विसर्ग ठरला.यापूर्वी यंदा ११ ऑगस्ट २०२२ रोजी २६ हजार ८०९ क्युसेक विसर्ग सोडला होता. असे खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे योगेश भंडलकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.