
पुणे - महापालिकेचा मिळकतकर थकविलेल्या मिळकतींवर महापालिका प्रशासनाकडुन आता जप्तीची कारवाई सुरु करण्यात येणार आहे. याबरोबरच अंदाजपत्रकातील उद्दीष्ट गाठण्यासाठी आता दररोज किमान १० कोटी रुपयांपर्यंतचा मिळकतकर वसुल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, समाविष्ट गावांमधील मिळकतींचा मिळकतकर व दंडाची रक्कम वसुल करण्यावर राज्य सरकारकडुन स्थगिती असल्याने यंदा कर आकारणी विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.