
पुणे - पुणे महापालिकेने ४० टक्केची सवलत देण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात भाडेकरू असणारे किंवा ज्यांची एक पेक्षा जास्त घरे आहेत अशा २ लाख २० हजार ६१६ मिळकतींची ४० टक्केची सवलत काढून घेण्यात आली आहे. आगामी २०२४-२५ च्या मिळकतकराच्या बिलातून १०० टक्के कर वसुली केली जाणार आहे.