Property Tax : पुणेकरांनो, लवकर मिळवा, करात ४० टक्के सूट

पुणेकरांनो, मिळकतकरात ४० टक्क्यांची सवलत मिळविण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत आहे.
Property Tax
Property Taxsakal

पुणे - पुणेकरांनो, मिळकतकरात ४० टक्क्यांची सवलत मिळविण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. तुम्हाला स्वतः फ्लॅटमध्ये किंवा घरात राहत असल्याच्या पुराव्यांसह ‘पीटी-३’ अर्ज भरून देणे अनिवार्य आहे. महापालिका प्रशासनाकडे असे सुमारे २ लाख ६४ हजार जणांचे अर्ज येणे अपेक्षित असताना पाच महिन्यांत केवळ ५० हजार जणांनी अर्ज केले आहेत. ही मुदत संपण्यास आता अवघे २० दिवस शिल्लक आहेत.

अशी मिळाली ४० टक्के सवलत

पुणेकरांना लागू असलेली १९७० पासूनची मिळकतकराची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ९७ हजार मिळकतींचा समावेश करण्यात आला. त्यांना २०१९ ते २०२२ या तीन वर्षांची ४० टक्के सवलतीची रक्कम फरकासह भरण्याचा आदेश देण्यात आला.

तसेच २०१९ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या मिळकतींची सवलत काढून घेतली. अव्वाच्या सव्वा बिल आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. ‘सकाळ’नेही नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून याचा पाठपुरावा सुरू केला. अखेर सरकारने अधिवेशनात पुणेकरांना पुन्हा ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.

तर सवलत जाणार

महापालिकेने ज्या मिळकतधारकांना २०१९ ते २०२२ या तीन वर्षांची फरकाची बिले पाठवली आहेत, तसेच ज्या नवीन मिळकतींना २०१९ पासून १०० टक्के बिल आकारणी झालेली आहे, अशा सदनिकाधारकांना ४० टक्क्यांची सवलत प्राप्त करून घेण्यासाठी व महापालिकेकडे भरलेली रक्कम वळती करून घेण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करणे आवश्‍यक आहे. अन्यथा त्यांना सवलत मिळणार नसून, नागरिकांनी मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिका मिळकतकर विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी केले आहे.

अशी मिळेल सवलत

  • ‘पीटी ३’ अर्जासोबत मिळकतीचा वापर स्वतः राहण्यासाठी करत असल्याचे सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र

  • मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅसकार्ड, रेशनकार्ड आदी

  • अर्ज जवळच्या क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षकांकडे जमा करावेत

  • पीटी ३ अर्ज महापालिकेच्या कार्यालयांसह propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध

  • अनेक नागरिकांच्या दोन मिळकती असू शकतात, त्यांच्या एकाच मिळकतीला सवलत मिळेल.

  • यासाठीची अंतिम मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com