Deenanath Mangeshkar Hospital
Deenanath Mangeshkar HospitalSakal

Property Tax : मिळकत कराच्या थकबाकीसाठी महापालिका पाठविणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून मिळकत कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार आला उघडकीस.
Published on

पुणे - दीनानाथ मंगेशकर रूग्णालय धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्याने त्यानुसार मिळकत करामध्ये सवलत देण्याबाबत रुग्णालय न्यायालयात गेले आहे. त्यावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही किंवा कर वसुलीला स्थगितीही दिलेली नाही. त्यामुळे २२ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून रुग्णालयास नोटीस बजावण्यात येणार आहे.

गरोदर महिलेवर वेळेत उपचार न केल्यामुळे तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे मंगेशकर रूग्णालयाविरुद्ध आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, रुग्णालयाकडून मिळकत कर भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

मात्र रुग्णालय प्रशासनाने महापालिकेचा मिळकत कराची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाच्या माध्यमातून कर भरत असल्याचे सांगण्यात आले होते. त्याबाबत महापालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी, या मागणीसाठी रूग्णालय प्रशासन २०१७ मध्ये न्यायालयात गेले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही तसेच न्यायालयाने कर वसुलीला स्थगिती देखील दिलेली नाही. त्यामुळे मिळकत कर आकारणी विभाग रुग्णालयास दरवर्षी नियमितपणे मिळकतकराचे बिल पाठविले.

रूग्णालय प्रशासनाने आत्तापर्यंत १५ कोटी रूपयांपेक्षा जास्त मिळकत कर भरला आहे. मात्र हा कर धर्मादाय कायद्यानुसार सवलत ग्राह्य धरून भरत असल्याने रुग्णालयाकडे थकबाकी राहात आहे.

थकबाकीवर दंड व व्याज आकारणी केली जात असल्याने ही थकबाकी सुमारे २२ कोटी रुपये आहे. ही थकबाकी भरावी, यासाठी रूग्णालय प्रशासनाला महापालिका नोटीस पाठवीत असल्याचे मिळकत कर आकारणी विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com