
पुणे : मिळकतकराच्या बिलावर मिळणाऱ्या पाच ते १० टक्के सवलतीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी नेहमीप्रमाणे यंदाही आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत मिळकतकर भरण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल ९३८ कोटी ३६ लाख रुपये इतका मिळकतकर जमा झाला आहे. सवलतीची मुदत संपण्यास आणखी पाच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.