Property Tax : मार्च अखेरमुळे सार्वजनिक सुट्टी दिवशीही मिळकतकर भरता येणार

पुणे महापालिकेकडून शनिवार, रविवार व सोमवारीही ग्राहक सेवा केंद्रांची सुविधा उपलब्ध, प्रलंबित प्रकरणांना मिळाली गती.
Property Tax
Property Taxsakal
Updated on

पुणे - आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दोन दिवसात शनिवार (ता. २९), रविवार (ता. ३०) व सोमवारी (ता. ३१) सुट्टी आल्याने मिळकत कर भरण्यासाठी नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शनिवारी व रविवारी देखील नागरीकांना मिळकत कर भरता येणार आहे. त्यासाठी दोन्ही दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत, याबरोबरच नागरीकांना ऑनलाईन माध्यमांद्वारे कर भरता येणार आहे.

महापालिकेच्य कर आकारणी व कर संगलन विभागाकडून मार्च महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत अधिकाधिक कर महापालिकेच्या तिजोरीत येण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी कर आकारणी विभागाकडून अनेक विशेष पथके तयार करून त्यांच्याकडे कर वसुलीची जबाबदारी सोपवली आहे.

याबरोबरच महिलांचेही एक पथक तयार करुन मिळकत कर वसुलीला प्राधान्य देण्यात सुरूवात केली होती. याबरोबरच कर आकारणीच्या प्रलंबित प्रकरणांचाही निपटारा करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असणारी पाचशेहून अधिक मिळकतींच्या प्रकरणांचा विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी निपटारा केला आहे. मिळकतकराचे बिल मिळाल्यानंतर तातडीने भरणा करू शकणाऱ्या मिळकतकरधारक आणि व्यावसायिकांच्या बिलांना प्राधान्य दिले जात आहे. मिळकतकराचे बिल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ भरणाही सुरू झाला आहे.

दरम्यान, मिळकत कर भरण्यासाठी ३१ मार्च हा अखेरचा दिवस असतो. बहुतांश नागरीक अखेरच्या टप्प्यात कर भरणा करण्यास प्राधान्य देतात. यावेळी २९ मार्च रोजी शनिवार, ३० मार्च रोजी रविवार तर ३१ मार्च रोजी रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आली आहे.

त्यामुळे थेट भरणा करणाऱ्या नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कर संकलन व कर आकारणी विभागाने शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील ग्राहक सेवा केंद्र सुरू ठेवली आहेत. त्यामध्ये नागरीक थेट मिळकतकराचा भरणा करू शकणार आहेत.

तसेच ऑनलाईन माध्यमांद्वारेही नागरीकांना कर भरता येणार आहे. थकबाकीदारांनी २ टक्के व्याज टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत कर भरावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

'अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून बिले काढून कर वसुल केला जात आहे. याबरोबरच सुट्टीच्या दिवशी नागरीकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ग्राहक सेवा केंद्रांबरोबरच नागरीकांना विविध प्रकारे ऑनलाइन माध्यमाद्वारेही कर भरता येणार आहे.' प्रतिभा पाटील, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, महापालिका.

ग्राहक सेवा केंद्रांची वेळ

शनिवार व रविवार - सकाळी १० ते सायंकाळी ७

सोमवार - सकाळी १० ते रात्री १०

ऑनलाईन भरणा करण्यासाठीची माध्यमे

नेट बॅंकींग, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, भारत क्‍युआर कोड, गुगल पे, फोन पे, पोस्ट डेबीट कार्ड, पोस्ट क्रेडीट कार्ड, युपीआय, ईबीपीपी, मोबाईल वॉलेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com