पुणे - कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे मोटार अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अपघातानंतर दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या दोन अधिकाऱ्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कर्तव्यावरील कसुरीचा ठपका ठेवण्यात आला होता.
येरवडा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना या दोघांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
एक अल्पवयीन मुलगा १९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमध्ये मित्रांसह पार्टी करून पोर्शे मोटारीतून निघाला होता. त्याने भरधाव गाडी चालवत एका दुचाकीला मागून धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला वाचवण्यासाठी मोठे नाट्य घडले.
आरोपी मुलाला वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप, पैशांचा प्रभाव आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे आई-वडील, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह दहाजण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.