पुणे शहरात समाविष्ट गावात मिळकतकराची अंमलबजावणीचा प्रस्ताव

पुणे शहरात समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून मिळकतकर वसूल केले जाणार आहे.
Income Tax
Income Tax Sakal
Updated on
Summary

पुणे शहरात समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून मिळकतकर वसूल केले जाणार आहे.

पुणे - शहरात समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून मिळकतकर (Income Tax) वसूल (Recovery) केले जाणार आहे. पहिल्या वर्षी २० टक्के कर (Tax) घेतला जाईल. त्यामध्ये दरवर्षी २० टक्के वाढ करून पाच वर्षानंतर संपूर्ण १०० टक्के कर लागू होणार आहे. मात्र, ज्या मिळकतींची नोंदणी ग्रामपंचायतींकडे आहे, अशांची थकबाकी (Arrears) देखील वसूल केली जाणार आहे. मिळकतकर विभागाने याचा प्रस्ताव तयार केला आहे. (Proposal for implementation of income tax in villages included in Pune city)

राज्य सरकारने जुलै महिन्यापासून शहराच्या हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या गावांमध्ये मिळकतकर किती असणार, तो कधी वसूल केला जाणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये होती. अखेर मिळकतकर विभागाने याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

२३ गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये १ लाख ९७ हजार ८३ मिळकतींची नोंदणी झालेली आहे. ग्रामपंचायतीकडून तेथे कर वसूल केला जात होता. गावांमध्ये बिल्टअप क्षेत्रावर कर आकारणी केली जाते. तर महापालिकेकडून ही कर आकारणी मिळकतीच्या कार्पेट एरिया नुसार केली जाणार आहे. त्यामुळे मिळकतीच्या क्षेत्रात त्यात १० टक्के कपात करून त्यावर कर आकारला जाणार आहे. महापालिकेने कर आकारणी सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी केवळ २० टक्के कर घेतला जाईल. यात प्रत्येक वर्षी २० टक्के वाढ केली जाईल. २०२६-२७ पासून या गावांमधील नागरिकांना १०० टक्के कर भरावा लागेल.

तसेच ज्या नागरिकांनी ग्रामपंचायतींकडे मिळकतीची नोंदणी केली आहे, अशांची थकबाकीही वसूल केली जाईल. व ज्यांनी नोंदणी केलेली नाही, अशा मिळकतींचा शोध घेतला जाणार आहे. ही कर आकारणी १एप्रिल २०२२ पासून सुरू केली जाणार आहे. त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

Income Tax
महसूल पथकातील तलाठ्यावर १० ते १२ जणांकडून शेवाळवाडी येथे हल्ला

वाघोलीतून सर्वाधिक महसूल

२३ गावात सर्वाधिक मिळकतींची नोंद वाघोली गावात झालेली आहे. तेथे ४१ हजार ५५७ मिळकती आहेत. त्याखालोखाल नऱ्हे येथे ४० हजार ६८६, मांजरी येथे ४० हजार ६३१ मिळकतींची नोंद आहे. तर सर्वात कमी ५५७ मिळकती नांदोशी-सणसनगर येथे आहेत.

अशी होणार कर आकारणी

२०२२-२३ - २०टक्के

२०२३-२४ - ४० टक्के

२०२४-२५ - ६० टक्के

२०२५-२६ - ८० टक्के

२०२६-२७ -१०० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Healthcare or Monopoly? Pune Hospitals Accused of Violating Patients’ Rights
Blood That Connects Lives: Pune Donors Set an Example of Selfless Service
Daily Travel Turns Into Ordeal for Thousands on Daund-Pune DEMU Route
PGs and Hostels Under Scrutiny, But Rules Remain on Paper for Six Months
Marathi News Esakal
www.esakal.com