प्रस्तावित मेट्रो कार डेपोची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - प्रस्तावित शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गातील कार डेपोच्या ५० एकर जागेची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.

पुणे - प्रस्तावित शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गातील कार डेपोच्या ५० एकर जागेची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनील वांढेकर, कार्यकारी अभियंता सारंगधर देवडे यांच्यासमवेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) अधिकारी उपस्थित होते.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)च्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये (डीपीआर) मेट्रो कार डेपोसाठीची ५० एकर जागा प्रस्तावित असून हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती- तंत्रज्ञान पार्क फेज ३ येथे हा डेपो होणार आहे. हा प्रस्तावित मेट्रो मार्ग २३.३ किलोमीटरचा असून त्या अंतर्गत २३ स्थानक असतील. ग्लोबल टेंडरींगद्वारे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर निविदा प्रक्रिया सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: proposal metro car depo watching