पुण्यातील नांदेड सिटीत मॉलमध्ये वेश्‍या व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नांदेड सिटी येथील मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

खडकवासला : नांदेड सिटी येथील मॉलमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये थायलंड येथील पाच महिला व एक व्यवस्थापक यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पोलिस निरीक्षक पद्माकर धनवटे यांनी केली आहे.

नांदेड सिटी येथील एका मॉलमध्ये ऑर्चिड फाइल स्पा नावाचे मसाज सेंटर आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. त्या वेळी तिथे वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.

हा व्यवसाय कादर शेख (रा. पापडे वस्ती, हडपसर) याच्या सांगण्यावरून व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल (रा. नांदेड सिटी) करीत होता. पोलिसांनी ससेमलला अटक केली आहे. शेख हा फरार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prostitution in mall at Nanded city in Pune