उन्हाळ्यात सापांना वाचवा; वन्य पशूपक्षी संरक्षण संस्थेचे आवाहन

Snake
Snake

नवी सांगवी - उन्हाळ्याच्या गर्मीत सर्पांचा खासकरून धामण व नाग या प्रजातींचा मिलनाचा काळ असल्याने ते नागरीवस्तीच्या आसपास दिसून येत असतात. अशा वेळेस भितीपोटी त्यांना न मारता सर्पमित्रांना पाचारण करून सापांचे संरक्षण करण्याचे आवाहन येथील वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात गवत, झाडी, नदीपाठ वा पाणवठ्याचा भाग उष्णतेमुळे सुकून जात असताना सर्पांच्या प्रजातींचा निसर्गअधिवास धोक्यात येत असतो. त्यामुळे बऱ्याचदा साप नागरवस्तीत दिसून येत असतात, अशा वेळेस सापांबद्दलचे अज्ञान वा भितीपोटी मनुष्यांकडून त्यांची सर्रास हत्या केली जाते. परंतु हे नष्ट होत जाणारे साप निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करीत असल्याचे सर्पप्रेमींचे म्हणने आहे. 

सापाच्या प्रजांतीतील घरात सापडणारा वाळा हा कीडे व मुग्यांची अंडी खाऊन आपल्याला प्रत्यक्षपणे मदतच करीत असतो. तर धामण, नाग, फुरसे अशा प्रकारचे प्रकारचा साप हा विंचू, गोम, बेडूक, वाळवी, उंदीर, पाली खाऊन मानवी जीवनात समतोल राखण्याचे काम करतो. तर झाडावरचे साप सरडे, पाली व पक्षी खाऊन मानवी त्यापासून होणारा उपद्रव रोखण्याचे काम करीत असतात. त्यामुळे या सर्पजातींना संरक्षण देण्याचे सर्पप्रेमींनी केले आहे. 

वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे म्हणाले, " उन्हाळ्यातील गर्मी हाच सापांचा मिलनाचा काळ असतो. भर उन्हात फिरणारी धामण ही लांबीने नऊ फुटापर्यंत असल्याने ती आपणला पडीत जमीन, शेती, नाले, नदीकाठ येथे ती सहजच नजरेस पडते. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा आपणाला हे सापांचे जुळ किंवा तीळं नजरेस पडते. " 

विषारी सर्प केवळ स्वरक्षणासाठी वेगवेगळे आवाज काढत असतात. नाग हा स्वतःच्या बचावासाठी तास न तास फुत्कारा टाकत फणा काढून उभा राहू शकतो. तर घोणस कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढून तिच्यापेक्षा मोठ्या प्राण्याला घाबरवीत असते. फुरसे स्वतःचे अंग घासून करवत घासल्यासारखा आवाज करते. रात्री वावर करणारा मण्यार हा कोणताही आवाज करीत नाही, बहुतांशीलोक याच्याच दंशामुळे दगावतात असल्याचेही बडदे यांनी प्राधान्याने निदर्शनास आणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com