
मंचर - 'प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे तब्बल १४४ वर्षानंतर भरणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी लाखो भाविक जात आहेत. पुण्याहून प्रयागराजला २५ दिवसांपूर्वी आठ हजार रुपये तिकीट होते. सध्या तिकिटासाठी ३१ हजार रुपये रक्कम घेतली जाते. विमान कंपन्यांनी विमानाच्या तिकीट दरात भरमसाठ तीन ते साडतीन पट वाढ केली आहे. भाविकांची होणारी लुट थांबवण्यासाठी विमान भाडे वाढीच्या विरोधात पुणे विमान तळासमोर संविनय पद्धतीने आंदोलन केले जाईल.' असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिला.