पुणे-पंढरपुर पालखीमहामार्गावर ठिय्या मारुन मोदी सरकारच्या विरोधात घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-पंढरपुर पालखीमहामार्गावर ठिय्या मारुन मोदी सरकारच्या विरोधात घोषणा

भारत बंदला वाल्हे (ता. पुरंदर) येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पुणे-पंढरपुर पालखीमहामार्गावर ठिय्या मारुन मोदी सरकारच्या विरोधात घोषणा

वाल्हे : भाजप सरकारने नव्याने आमलात आणलेल्या कृषी कायदा रद्द करा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला वाल्हे (ता. पुरंदर) येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. राजकिय पक्ष व विविध संघटनांनी या बंदला जाहीर पाठिंबा देत गावातील दुकाने, व्यापारी, 
बाजारपेठा पुर्णत: बंद करुन कडकडीत बंद पाळला. यावेळी पुणे-पंढरपुर पालखीमहामार्गावर ठिय्या आंदोलन करुन भाजप सरकारचा जाहीर निषेधकरण्यात आला.

Bharat Bandh : महाविकास आघाडीचा पुण्यातील मोर्चा पोलिसांनी रोखला; परवानगी नाकारली 

भाजप सरकारने नव्याने अंमलात आणलेल्या कृषी कायद्याला विरोध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्या हाकेला वाल्हे (ता. पुरंदर) येथील राजकिय पक्ष व विविध शेतकरी संघटनांसह गावातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी पुणे जिल्हा बॅकेचे 
माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विधेयकविरोधी फलक हातात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गावांतर्गत निषेधफेरी काढुन पुणे-पंढरपुर पालखी महामार्गावर ठिय्या आंदोलन करुन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन निषेध फेरीला सुरवात झाली. निषेध फेरी दरम्यान बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यानजिक पुणे-पंढरपुर 
पालखी महामार्गावर ठिय्या मारुन निषेधफेरीचा समारोप करण्यात आला.

यामध्ये सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, सोमेश्वरचे संचालक मोहन जगताप, अॅड.फत्तेसिंग पवार, भाऊसाहेब भोसले, गिरीष पवार, राहुल तांबे, सतिश सुर्यवंशी, सुनिल पवार, बाळासाहेब राऊत, महादेव चव्हाण, समदास भुजबळ, हनुमंत
पवार, संदेश पवार, सागर भुजबळ, बजरंग पवार, रणसिंग पवार आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतात अहोरात्र कष्ट करणाऱे शेतकरी आणि सिमेवरील जवानांमुळे देश सुरक्षित आह.प्रगतीची भाषा करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने या घटनांकडे दुर्लक्ष करु नये., अन्यथा 'जय जवान जय किसान' या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा 
पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी दिला.

दरम्यान यावेळी अॅड.फत्तेसिंग पवार, दत्तात्रय पवार, बाळासाहेब राऊत,महादेव चव्हाण, समदास भुजबळ, सागर भुजबळ, आझाद पवार, मोहन जगताप, राहुल तांबे आदिंनी मनोगय व्यक्त करुन भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. माजी सरपंच दत्तात्रय पवार यांनी प्रास्ताविक केले.दिपक कुमठेकर यांनी आभार मानले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टॅग्स :Bjp