मनसे कोथरूड विभागाच्यावतीने प्रशासनाच्या विरोधात 'रस्त्यांवरचे खड्डे' आंदोलन

खड्यांच्या भोवती रांगोळी काढून घोषणा देत महापालिका प्रशासनाचा निषेध
Protest against the administration on behalf of MNS Kothrud
Protest against the administration on behalf of MNS Kothrud

मयुर कॉलनी - पाऊस, रस्त्यावर खड्डे आणि वाहतूक कोंडी ही कोथरूडकरांची दिनचर्या झाली आहे. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. आशा अनेक तक्रारी नागरिक मनसे कडे करत आहेत. या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोथरूड विभागाच्यावतीने आज कोथरूड परिसरात आंदोलन करण्यात आले.

यावेळी खड्यांच्या भोवती रांगोळी काढून घोषणा देत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला व लवकर खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिला.

आजच्या आंदोलनात विभाग सचिव राजेंद्र वेडेपाटील, शहरसंघटक शैलेश जोशी, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, सचिन विप्र,गणेश शिंदे,पांडुरंग सुतार, शाखा अध्यक्ष विराज डाकवे,किरण उभे, शुभम गुजर, किरण जोशी, ज्ञानेश्वर काकडे व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com