IISER College Student Agitation
sakal
पुणे - प्रशासकीय मनमानी, मानसिक आरोग्याच्या सुविधांचा अभाव आणि विद्यार्थी प्रतिनिधींची मुस्कटदाबी यावरून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. विद्यार्थी परिषदेचे महासचिव राज बागवे यांच्या निलंबनानंतर विद्यार्थ्यांमधील असंतोष उफाळून आला असून, प्रशासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.