खंडाळा - टिपु सुलतान वकतण्याचा निषेध - जोडो मोरो आंदोलन .
हर्षवर्धन सपकाळचा खंडाळ्यात निषेध
खंडाळा, ता. २१ ः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या निषेधार्थ खंडाळा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. खंडाळा तहसील कार्यालयासमोर सपकाळ व ओवेसी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
खंडाळा तालुका सकल हिंदू समाज बांधव कृती समिती व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वतीने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेले वक्तव्य अत्यंत खेदजनक असून, यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे अद्वितीय आहे. त्यांनी अठरापगड जाती एकत्र केले, महिलांचा सन्मान केला आणि रयतेच्या कल्याणावर आधारित स्वराज निर्माण केले. मात्र टिपू सुलतान याचा इतिहास रक्ताने माखलेला आहे. धर्मांतर व कत्तली करणे असा आहे, तरी या वक्तव्याचा निषेध करत असून, अशा वक्तव्याची दखल घेऊन शासनस्तरावर योग्य ती कारवाईसाठी पाठपुरावा करावा, तसेच अशा प्रकारची वादग्रस्त विधाने करून सामाजिक सलोखा बिघडणाऱ्यावर नियंत्रण ठेवावे, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, तहसील प्रशासकीय कार्यालयासमोर जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
----
06004
खंडाळा ः सुनील शेळके यांना निवेदन देताना खंडाळा तालुका सकल हिंदू समाज बांधव कृती समितीचे कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

