विश्रांतवाडी - धानोरी येथील मयूर किलबिल हाउसिंग सोसायटीत नाल्याच्या संरक्षक भिंतीचा कोसळलेला भाग बांधकाम व्यावसायिकाने अर्धवट टाकून दिला असून, 24 जूनपासून सर्व काम थांबवले गेले आहे..त्यामुळे संपूर्ण परिसर धोकादायक आणि अपूर्ण स्थितीत राहिला आहे. तसेच त्याचा राडारोडा रस्त्यात टाकल्याने सोसायटीत जाण्याचा रस्ता व पार्किंगची जागा अडली आहे. वाहनाना आत जायला अडचणीचे ठरते. यामुळे हे काम लवकर करावे म्हणून रहिवाशांनी आज बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणाविरोधात शांततामय आंदोलन केले..नाल्याच्या भिंतीचे काम तात्काळ पूर्ण करावे, मलबा हटवून सर्व रस्ते व प्रवेशमार्ग मोकळे करावेत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात या मागण्यांसाठी केलेल्या आजच्या आंदोलनात महिलांचा, वृद्धांचा आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.सर्वांनी हातात फलक घेऊन बांधकाम व्यावसायिकाचा निषेध केला. ‘आमचा रस्ता मोकळा करा’, ‘बिल्डर जबाबदारी घ्या’, ‘हक्कासाठी लढा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या आंदोलनात सोसायटीतील 253 कुटुंबांनी सहभाग घेतला..यासंदर्भात येथील रहिवासी उमेश पाटील म्हणाले की सुरक्षा भिंत पडल्यावर ते बांधण्याचे बिल्डरने दिलेले आश्वासन पाळलेले नाही. वैद्यकीय आपत्कालीन सेवा, फायर ब्रिगेड, शालेय वाहतूक यांसाठी रस्ता मोकळा नसल्यामुळे गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.पावसामुळे पूरस्थिती आणि स्ट्रक्चरल डॅमेजचा धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे..यासंदर्भात येथील रहिवासी तपन दास म्हणाले की या प्रकरणात महानगरपालिकेने त्वरित लक्ष घालावे व बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई करून काम पूर्ण करण्यास भाग पाडावे.यासंदर्भात सोसायटीचे बांधकाम व्यावसायिक मोहन आगरवाल म्हणाले की भिंत पड़ल्यावर तातडीने आम्ही नाल्यातील राडारोडा काढून टाकला आहे. पण पाऊस असल्याने भिंत बांधता आलेली नाही..खरे तर सोसायटी झाल्यावर त्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही आमची जबाबदारी नाही. सोसायटीने नंतरच्या काळात भिंतीजवळ ओपन जिमचे सामान ठेवले. तिथे झाडे लावली, त्याच्या मुळामुळे भिंत पोखरून पडली असावी. तरी आम्ही मदतीला आलो. पण सोसायटीतील नागरिकांचे हवे तसे सहकार्य मिळत नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.