मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात, 'हाथरस येथील घटना निंदनीय'

डाॅ. संदेश शहा
Tuesday, 6 October 2020

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे मुलीवर झालेला अत्याचार निषेधार्य असून, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर : उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे मुलीवर झालेला अत्याचार निषेधार्य असून, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

स्वाभिमानी चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व तहसिलदार सोनाली मेटकरी यांना स्वाभिमानी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

मंत्री भरणे पुढे म्हणाले, ''दलित मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे ती मरण पावली. ही घटना निंदनीय आहे.''
विठ्ठल ननवरे म्हणाले, ''हाथरस जिल्ह्यातील मनीषा वाल्मिकी हिच्यावर अत्याचार करणाऱ्या चारीही नराधमांनी अत्यंत क्रूरपणे हा प्रकार केला. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे.'' 

यावेळी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू शेवाळे, माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दुर्वास शेवाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णा हराळे, कार्याध्यक्ष बंडू लांडगे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पाचंगणे, युवा तालुकाध्यक्ष नवनाथ सोनवणे, शहराध्यक्ष बंडू लांडगे, उपाध्यक्ष सुहास शेवाळे, गणेश कांबळे, विजय शेवाळे, सुनील कांबळे उपस्थित होते.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest in Indapur over the incident at Hathras