Pune News : लासुर्णेमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन...

अतिदुर्गम भागातील रस्त्यापेक्षा इंदापूर तालुक्यातील रस्त्याची वाईट अवस्था...
protest of villagers from Lasurne pune road development
protest of villagers from Lasurne pune road developmentsakal

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील लाहिरोबानगर ते मानकरवाडीच्या रस्त्याची अवस्था अतिदुर्गम भागातील रस्त्यापेक्षा वाईट झाल्यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नागरिकांनी लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील चिखलीफाटा येथे बारामती-इंदापूर राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

आंदोलनामध्ये शाळेतील मुले,मुली,भजनीमंडळ सहभागी झाले होते. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील लाहिराेबानगर-कर्दनवाडी-मोहितेवाडी- मानकरवाडी या सुमारे ६ कि.मी रस्त्यांची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे.

गेल्या १५ ते २० वर्षापासून रस्त्याची सर्वत्र खडी उचकटली असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माेहितेवाडी ते मानकरवाडी दरम्यानचा रस्ता तर पूर्णपणे उचकटला असून जागोजागी खचला असल्यामुळे चारचाकी गाडी रस्त्याने जात नाही. लासुर्णे परीसरातील जामदारवस्ती,कर्दनवाडी,बंबाडवाडी, मोहितेवाडी,थोरातवस्ती परीसरातील नागरिकांना नियमितच्या कामासाठी दररोज या रस्त्याने ये-जा करावी लागत आहेत.

तसेच लासुर्णे येथील शाळेमध्ये दररोज अनेक मुले-मुली येत असून त्यांनाही रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी नागरिकांच्या वतीने अशाेक इंगवले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कर्दनवाडी ते लाहिरोबानगर दरम्यान रस्त्याला कुठे डांबर शिल्लक राहिले नाही. रस्त्याची सर्व खडी उचकटली आहे.

शेतीच्या कामासाठी तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी भाडोत्री वाहन ही मिळत नाही.एवढी वाईट परस्थिती रस्त्याची झाली असल्याचे सांगितले.यावेळी आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या वतीने संजय कदम यांनी संपूर्ण रस्त्याची माहिती सांगून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती सांगितली.

रास्तारोको आंदोलनामध्ये महिलाही तसेच शाळेतील मुले,मुली ही उत्सफुर्तपणे सहभागी झाले होते. भजनीमंडळाने भजन केले. पसायदानाने रास्तारोको आंदोलनाचा शेवट करुन रस्त्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी इयत्ता नववीमध्ये शिकणारी गौरी गायकवाड व इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या सोनिया गायकवाड यांनी सांगितले की, खराब रस्त्याने दररोज शाळेमध्ये यावे लागत आहे.रस्त्यावर दगड-उचकटेली खडी आहे. सायकल पंम्चर होत आहे. रस्त्याने सायकल चालवणे ही अवघड होत असून धुराळा उडत आहे.

यावेळी रास्तारोको मध्ये ललिता किसन खिलारे यांनी सांगितले की, माझा मुलगा आजारी आहे. त्याला सातत्याने दवाखान्यामध्ये न्यावे लागत असते. मात्र खराब रस्त्यामुळे भाडोत्री गाड्याही मिळत नाही. रस्त्याची खडी उचकटल्यामुळे मणक्याला ही त्रास होत असल्याचे सांगितले.

पत्रके वाटप..

रास्तारोको आंदोलनापूर्वी लाहिरोबानगर ते उद्धट रस्त्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सदरच्या रस्ता निधी अद्यापही मंजूर नसल्यामुळे रास्तारोको करणाऱ्या नागरिकांनी प्रधानमंत्री ग्रामसडक

योजनेचे कार्यकारी अभियंता श.श्री.कुलकर्णी यांच्या सहीच्या पत्र्याचे झेरॉक्स नागरिकांना देवून आपली दिशाभूल करीत असल्याचे सांगितले.पत्रामध्ये सदरचा रस्ता प्रस्तावित असून रस्त्याचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेच्या प्रतिक्षेत असल्याचा उल्लेख आहे.लासुर्णेमध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन...

अतिदुर्गम भागातील रस्त्यापेक्षा इंदापूर तालुक्यातील रस्त्याची वाईट अवस्था...

वालचंदनगर ता. ११ इंदापूर तालुक्यातील लाहिरोबानगर ते मानकरवाडीच्या रस्त्याची अवस्था अतिदुर्गम भागातील रस्त्यापेक्षा वाईट झाल्यामुळे तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नागरिकांनी लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील चिखलीफाटा येथे बारामती-इंदापूर राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन केले.आंदोलनामध्ये शाळेतील मुले,मुली,भजनीमंडळ सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com