

MPSC student agitation stop
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनिश्चितता आणि आयोगाच्या कारभारातील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अकराव्या दिवशी स्थगित झाले. कथित परीक्षा गैरप्रकारांच्या चौकशीसाठी समिती नेमणे आणि आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला.