पुणे : वानवडी पोलिसांकडून सीएएविरोधी आंदोलनकर्ते ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

गोळीबार मैदान चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा आणि कुल जमाते तंझीम च्या वतीने धरणा आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन सुरु असताना वानवडी पोलिसांनी 48 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

कॅन्टोन्मेंट : देशभरात सध्या विविध ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलने केली जात आहे. या अनुषंगाने गोळीबार मैदान चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा आणि कुल जमाते तंझीम च्या वतीने धरणा आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन सुरु असताना वानवडी पोलिसांनी 48 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम्ही प्रत्येक जन आमच्या हक्कासाठी  लढा देत आहोत. हा कायदा संविधानविरुद्ध आहे. त्यामुळे हा तातडीने रद्द झाला पाहिजे. अशी मागणी केली आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांकडून केली जात आहे.
यावेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ  इंडिया, बहुजन क्रांती मोर्चा, नवयुग निर्माण समिती व विविध संघटना सह  सुमारे 300 ते 400 हुन अधिक नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. 

यावेळी रझी खान, ताज सिद्दीकी, शाकीर काझी, श्रीकांत ओव्हाळ, शाहरुख सय्यद  आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतली नसल्यामुळे 48 जणांना ताब्यात घेतले असल्याचे वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protesters of CAA against rally arrested by Wanowadi police Pune