esakal | मातंग समाजावरील अन्यायाचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

मातंग समाजावरील अन्यायाचा निषेध

मातंग समाजावरील अन्यायाचा निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव (ता.माळशिरस) येथील साठे कुटुंबीयांवर अन्याय झाला. या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्यावतीने बुधवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

बोरगाव येथील स्मशानभूमीत मातंग समाजातील कुटुंबाला मृत व्यक्तीच्या अंत्यविधीस परवानगी दिली नाही. या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. शहर आणि जिल्ह्यातील मातंग समाजासह विविध संघटनांच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेस दोन आठवडे उलटूनही आरोपींना अद्याप अटक झाली नाही. आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त सौरभ राव यांना या वेळी देण्यात आले.

पीडित कुटुंबातील दशरथ साठे, नगरसेवक सुभाष जगताप, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे अनिल हातागळे, राजाभाऊ धडे, विनोद शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे शंकर तडाखे, दलित युवक आंदोलनाचे सचिन बगाडे, अॅड. राजश्री अडसूळ, रवी पाटोळे, मातंग एकता आंदोलनाचे विठ्ठल थोरात, महेश सकट, संजय केंदले आदी या वेही उपस्थित होते.

loading image
go to top