'प्रो वकील'मुळे खटला लढणे सोपे!

provakil
provakil

आयआयटी खरकपूरमधून शिक्षण घेतलेले पूलकित आनंद व शाश्वत सिक्का आणि ॲड. अक्षत आनंद हे तिघे ‘प्रो वकील’ हे स्टार्टअप चालवत आहेत. हे स्टार्टअप २०१५मध्ये सुरू झाले असून, सध्या १००हून अधिक बड्या कंपन्यांना सुविधा पुरवत आहे. दिल्लीत स्थापन झालेल्या या व्यवसायाचे जाळे आता पुणे, मुंबईसह पाच शहरांत पसरले आहे. स्टार्टअप सुरू केल्यापासून प्रत्येक सहा महिन्यांत त्यांची उलाढाल दुप्पट होत आहे. या स्टार्टअपच्या स्थापना आणि प्रगतीविषयी...

अक्षत आनंद यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. अल्पावधीतच वकिलीत जम बसल्याने त्यांच्याकडे सुमारे दीडशे प्रकरणे आली, मात्र या सर्व प्रकरणांचा पसारा सांभाळणे त्यांच्यासाठी अवघड होऊ लागले. कोणत्या केसचे काय अपडेट आहेत, दाव्याबाबत काय माहिती घ्यायची आहे यांसारख्या अनेक बाबींची कागदोपत्री माहिती शोधणे प्रचंड वेळखाऊ ठरत होते. स्वतःलाच भेडसावत असलेल्या या अडचणींचे डिजिटल उत्तर त्यांनी शोधले. त्यातूनच ‘प्रो वकील’ हे स्टार्टअप सुरू झाले. अक्षत यांचे मोठे भाऊ आणि त्याचा एक मित्र अशा तिघांनी मिळून सुरू केलेल्या या स्टार्टअपची सध्याची वार्षिक उलाढाल १० ते १५ कोटी रुपये आहे. 

आयआयटी खरकपूरमधून शिक्षण घेतलेले पूलकित आनंद व शाश्वत सिक्का आणि ॲड. अक्षत आनंद हा स्टार्टअप चालवत आहेत. हे स्टार्टअप२०१५ मध्ये सुरू झाले असून, सध्या १०० हून अधिक बड्या कंपन्यांना सुविधा पुरवत आहे. दिल्लीत स्थापन झालेल्या या व्यवसायाचे जाळे आता पुणे, मुंबईसह पाच शहरांत पसरले आहे. स्टार्टअप सुरू केल्यापासून प्रत्येक सहा महिन्यांत त्यांची उलाढाल दुप्पट होत आहे. आपल्या या यशाबद्दल अक्षत सांगतात, ‘‘मी २०१३मध्ये कॉलेज पूर्ण करून वकिली सुरू केली. दोन वर्षांच्या काळात अनेक केसेस मिळाल्या, मात्र त्यांचे व्यवस्थापन करणे अवघड होत चालले होते. एखाद्या केसची स्थिती काय आहे, त्याबाबत वेगवेगळे निकाल कोणते, पुढील तारीख काय आहे, एखाद्या केसमध्ये आपल्याला कोणते पुरावे हवे आहेत यांसारख्या अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आणि वेळेवर करणे अवघड होत चालले होते. त्यामुळे या सर्व बाबी डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेण्याच्या विचारातून २०१५मध्ये आम्ही दिल्लीत ‘प्रो वकील’ स्टार्टअप सुरू केला. अल्पावधीतच त्यास मोठी पसंती मिळाली. त्यानंतर आमचे ग्राहक वाढतच आहेत.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॅाकडाउननंतर मिळाला बुस्टर
‘प्रो वकील’ सध्या आयसीआयसीआय, बजाज, मॅनकाइंड फार्मा, इन्फोटोकियो जनरल इन्शुरन्स, टोयोटो, किर्लोस्कर, डीआरजीओ यांसारख्या तब्बल १०० बड्या कंपन्यांना सुविधा पुरवत आहे. लॉकडाउननंतर आमच्या स्टार्टअपला मागणी वाढली आहे. गेल्या महिन्याभरात अनेकांनी आमची सेवा घेण्याबाबत चौकशी केली आहे. सर्वच क्षेत्रात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होणार असल्याने येणारा काळ आमची व्याप्ती वाढवणारा असेल, असा विश्वास अक्षत यांनी व्यक्त केला.

'प्रो वकील' ची कार्यपद्धती

  • एखाद्या सरकारी विभागाच्या, कंपनीच्या किंवा मोठी लॉ-फर्म असलेल्या वकिलांच्या अनेक केसेस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुरू असतात. 
  • केवळ फौजदारी नाही, तर दिवाणी, ग्राहक आयोग आणि विविध न्यायाधिकरणे या ठिकाणी देखील या सर्वांची प्रकरणे असतात. 
  • यातील प्रत्येक प्रकरणाची इत्थंभूत व अद्ययावत माहिती ग्राहकाकडे असेलच असे नाही. असली तरी शेकडो प्रकरणाचे व्यवस्थापन करणे सोपे नसते. 
  • ‘प्रो वकील’ ही सर्व माहिती एकत्र करून त्याचा डेटाबेस तयार करते. 
  • ग्राहकांना ज्या प्रकारे ही माहिती हवी आहे, त्या प्रकारात त्यांना अगदी एका क्लिकवर ती उपलब्ध करून दिली जाते. 
  • या सर्व माहितीचा एक डॅशबोर्ड तयार केला जातो व ‘प्रो वकील’ तो अपडेट करत असतो. 
  • त्यासाठी लागणारी माहिती न्यायालयांची संकेतस्थळे आणि सर्वसामान्य नागरिकांना खुल्या असलेल्या माहितीचा आधार घेतला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com