PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

एमपीएससी ‘संयुक्त पुर्व परीक्षा गट-ब (अराजपत्रित) २०२५’ परीक्षेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या भरती प्रक्रियेला विलंबाचे लागले ग्रहण.
MPSC Exam

MPSC Exam

esakal
Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘संयुक्त पुर्व परीक्षा गट-ब (अराजपत्रित) २०२५’ परीक्षेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या भरती प्रक्रियेला विलंबाचे ग्रहण लागले आहे. मुख्य परीक्षा होऊन तीन महिने उलटले, अंतिम उत्तरतालिका जाहीर होऊनही जवळपास दोन महिने होत आले, तरी सर्वसाधारण गुणवत्ता यादी (जीएमएल) जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे दोन महिन्यांत निकाल लावण्याच्या आयोगाच्या अध्यक्षांच्या वल्गना हवेतच विरल्या असून, या लालफीतशाहीवर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com