psi pramod chintamani
sakal
पुणे - दोन कोटी रुपये लाचेची मागणी करून ४६ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या अधिकाऱ्याच्या घरझडतीत ५१ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही रोकड मोजण्यासाठी ‘एसीबी’च्या पोलिस अधिकाऱ्यांना मशिनचा वापर करावा लागला.