esakal | एसटीच्या 3500 गाड्यांमध्ये "पीआयएस'
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC

दोनशे ई-बस घेणार
केंद्र सरकारने ई-बसचा वापर वाढविण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार आता 200 ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रसिद्ध झाली. त्यातील 50 बससाठी केंद्र सरकार अनुदान देणार आहे. पहिल्या टप्प्यात ई-बस जवळच्या मार्गांवर धावतील. त्यांची तांत्रिक क्षमता पाहून 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या मार्गांवर पाठविण्यात येतील. या ई-बस वातानुकूल असतील. त्यामुळे प्रवाशांना साध्या बसच्या भाड्यात एसी बसमधून प्रवास करता येईल, असेही देवल यांनी सांगितले.

एसटीच्या 3500 गाड्यांमध्ये "पीआयएस'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - एसटी महामंडळाच्या बसमध्ये लाइव्ह व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) आणि पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम (पीआयएस) बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सुमारे 3 हजार 500 बसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली; तसेच पुणे मार्गावर धावणाऱ्या "शिवनेरी'च्या सर्व बसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येत आहे.

एसटी बसचे नेमके लोकेशन समजण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवून नियंत्रण करण्यासाठी; चसेच ही यंत्रणा बसविण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देवल यांनी दिली. नाशिक आगारातील सर्व बसमध्ये या दोन्ही यंत्रणा बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एसटी बससाठी मुंबईत एसटीच्या मुख्यालयात नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहे. प्रवाशांसाठी अल्पावधीत मोबाईल ऍपही तयार करण्यात येत आहे. त्यावरून प्रवाशांना बस "ट्रॅक' करता येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

महामंडळाच्या ताफ्यात 250 आगारांत सध्या 20 हजार बस आहेत. राज्यातील प्रमुख स्थानकांत बसचे वेळापत्रक एलईडी स्क्रीनवर प्रवाशांना पाहता येईल. सध्या 23 स्थानकांत 57 एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

loading image
go to top