Video : टाकीवर चढत मनोरुग्णाने रंगविले दोन तास नाट्य 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पाण्याच्या टाकीवर चढलेल्या मनोरुग्णाला खाली उतरविण्यास तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांना यश आले. जनता वसाहत पर्वती जलशुद्धीकरण केंद्र परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर गजानन वारके (वय 29) हा दुपारच्या सुमारास चढला. वर चढून त्याने आरडाओरडा सुरू केला.

सिंहगड रस्ता(पुणे) : पाण्याच्या टाकीवर चढलेल्या मनोरुग्णाला खाली उतरविण्यास तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांना यश आले. जनता वसाहत पर्वती जलशुद्धीकरण केंद्र परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर गजानन वारके (वय 29) हा दुपारच्या सुमारास चढला. वर चढून त्याने आरडाओरडा सुरू केला.

'मीडियाला बोलवा' म्हणत त्याने गदारोळ घातला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिस आल्यावर त्याने उडी मारण्याचा पवित्रा घेतला. 'पोलिस वर आले तर मी उडी मारेन,' अशी धमकीच त्याने दिली. दरम्यान, अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. खालून त्याला बोलण्यात गुंतवून पोलिस कर्मचारी अमोल गणगणे आणि दत्ता श्रीमंगणे हे टाकीवर चढले. वर गेल्यावर श्रीमंगणे यांनी त्याला बोलण्यात गुंगवले आणि गणगणे यांनी मागून जाऊन त्याला पकडले. तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाने खाली जाळी लावली होती. दोन तासांच्या नाट्यानंतर गजाननला खाली घेण्यात यश आले. 

गजानन हा मूळचा मुलगुंड (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील असून, सध्या तो जनता वसाहतीत राहत आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज अभंग यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psychiatric did drama for Two hours by mounting on tank in pune