

सासवड, ता. १४ : झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालून पोलिसांशी उद्धट वर्तन करणाऱ्या एका तरुणासह महिलेवर सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
किरण संजू झंजोट (वय २९, रा. येरवडा) आणि पायल गायकवाड (वय ३१, रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. झेंडेवाडी येथे गुरुवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास काही व्यक्ती पाठलाग करत असल्याचा कॉल पोलिसांना मिळाला होता. गस्तीवरील पोलीस मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले असता, किरण आणि पायल हे दोघे तिथे मिळून आले. पोलिसांनी मदतीबाबत विचारणा केली असता, दोघांनी मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घातली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर किरणने स्वतःच्या जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीत दोघेही नशेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस नाईक नीलेश पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.