CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

पुण्यात एका कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना पारंपरिक गणेशोत्‍सव साजरा करण्‍यावर भर देण्‍याचे केले आवाहन.
Pune Ganeshotsav

Pune Ganeshotsav

sakal

Updated on

पुणे - ‘एखादा सण व उत्‍सव साजरा करताना तो पारंपरिक पद्धतीने साजरा करता आला तर त्‍याचे महत्त्व अधिक असते. पण त्‍याचवेळी वर्षानुवर्षे काही पद्धती पडतात. त्‍या बंद करत असताना केवळ कायद्याच्‍या बडग्‍याने बंद न करता त्‍यासोबत लोकांना विश्‍वासात घेऊन त्‍यातून मार्ग काढणे हे अधिक महत्त्वाचे आहे. लोकसहभागातूनच ‘डीजे’ चे जे स्‍तोम आले आहे ते कमी होईल व यंदाचा गणेशोत्‍सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com