
शिवाजीनगर : दररोज जवळपास पाचशे नागरिक वापर करत असलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जात नसल्याने वडारवाडीतील रहिवाशांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील स्वच्छता केली जात नसल्याचे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत.