गणेश उत्सव बातमी

गणेश उत्सव बातमी
Published on

गणेशोत्सवात फिरती स्वच्छतागृहे उभारा
संजय झिंजे ः महापौरांना निवेदनाद्वारे साकडे
अहिल्यानगर, ता.३ ः गणेशोत्सवाच्या काळात अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहिल्यानगर शहरात लवकरच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध गणेश मंडळांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील आकर्षक देखावे पाहण्यासाठी, तसेच गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक शहरात दाखल होतात. यामध्ये महिला व मुलींची संख्याही मोठी असते. मात्र, शहरातील अनेक भागांत महिलांसाठी पुरेशा सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने आतापासूनच आवश्‍यक नियोजन करावे, अशी मागणी झिंजे यांनी केली आहे. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या महिला, तसेच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सुविधा मिळणे आवश्‍यक आहे. स्वच्छतागृहासारखी अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांची कुचंबणा होणे ही गंभीर बाब असल्याचे झिंजे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com