esakal | माध्यमांनी ‘जागल्या’ची भूमिका घ्यावी - श्रीराम पवार
sakal

बोलून बातमी शोधा

माध्यमांनी ‘जागल्या’ची भूमिका घ्यावी - श्रीराम पवार

सोनाली शिंदे लिखित ‘पॉलिक्‍लिक’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने ‘मीडिया, सोशल मीडिया आणि निवडणुका’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

माध्यमांनी ‘जागल्या’ची भूमिका घ्यावी - श्रीराम पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - वर्तमानपत्रांपासून ते आधुनिक काळातील नवी माध्यमे ही लोकमानसावर परिणाम घडविण्यासाठी आहेत. आपल्या देशात सर्वोच्च असलेल्या राज्यघटनेच्या चौकटीत लोकमानस घडवायचा, हे सोडून घडणाऱ्या प्रत्येक भूमिकेवर हरकत घेतली पाहिजे. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या माध्यमांनीही ‘जागल्या’ची भूमिका घेतली पाहिजे,’’ असे मत ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

सोनाली शिंदे लिखित ‘पॉलिक्‍लिक’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने ‘मीडिया, सोशल मीडिया आणि निवडणुका’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. पत्रकार रवी आमले, प्रसन्न जोशी, डॉ. परिमल माया सुधाकर यांनी यात सहभाग घेतला. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. पवार म्हणाले, ‘‘देशात २०१४ च्या तुलनेत सध्या सामाजिक माध्यमांची समज वाढलेली दिसते. लोक आता प्रश्‍न विचारू लागले 

आहेत. कोणता नेता, पक्ष, निवडणूक आदी पुरते हे माध्यम मर्यादित राहिलेले नाही.’’ डॉ. परिमल म्हणाले, ‘‘सर्वेक्षणाला आधुनिक काळात खूप महत्त्व आले आहे. पण, त्याचा थेट परिणाम मतदानावर होत नाही. ते सर्वेक्षण कधी केले ते महत्त्वाचे असते. त्यातही भारतासारख्या देशात सर्वेक्षण हे क्‍लिष्ट ठरते.’’ जोशी म्हणाले, ‘‘नवीन माध्यमांचे महत्त्व सत्ताधारी पक्षांनी जाणले म्हणून त्याचा प्रभावी वापर केला.’’ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. भारत पाटील यांनी आभार मानले.

आपल्या मनावर आणि मतावर परिणाम करण्याची क्षमता समाज माध्यमांमध्ये असते. समाजातील विशिष्ट घटक, आर्थिक गट, वय यानुसार निश्‍चित समूहाला संदेश या माध्यमांमधून दिला जातो.
- रवी आमले, पत्रकार

loading image
go to top