‘पोलिओ’ लसीकरणासाठी ११२३ केंद्रे

‘पोलिओ’ लसीकरणासाठी ११२३ केंद्रे
Published on

पिंपरी, ता. २४ ः राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस रविवारी (ता. २८) दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक हजार १२३ लसीकरण केंद्रांची स्थापना केली असून सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरात विविध माध्यमांतून, तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वनीवर्धकाद्वारे आवाहन केले जात आहे. विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारेही जनजागृती केली जात आहे. विविध बूथवर बालकांना लसीचे दोन थेंब देण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी सहभाग
लसीकरणासाठी आठ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४,५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लब स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोहिमेत सहभागी होणार आहेत.

नवजात बालकांनाही लस
पाच वर्षांखालील सर्व अर्थात नवजात बालकांसह किरकोळ आजारी बालकांनाही पोलिओची लस देता येते. यापूर्वी लसीकरण झालेले असले तरी, पुन्हा डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे पाच वर्षांखालील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

असे आहे लसीकरण नियोजन
- रविवार, २८ जून ः सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध केंद्रांवर
- सोमवार, २९ जून ते ३ जुलै ः आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे घरोघरी जाऊन लसीकरण

लसीकरणाची ठिकाणे
- महापालिका दवाखाने व रुग्णालये, खासगी रुग्णालये, अंगणवाडी केंद्र ः १००८
- बस, रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवर ट्रान्झिट लसीकरण केंद्र ः ३५
- वीटभट्ट्या, बांधकामे, स्थलांतरित वस्त्यांमध्ये फिरती लसीकरण केंद्र ः ७७
- रात्री लसीकरण सेवेसाठी नियुक्त पथके ः ३

पोलिओमुक्त देश करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या पाच वर्षांखालील बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com