Pulse Polio Vaccination
sakal
पुणे - पुणे महापालिकेकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्याद्वारे येत्या रविवारी (ता. १२) शहरातील शून्य ते पाच वयोगटातील ३ लाख १२ हजार बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उदि्दष्टय ठेवण्यात आले आहे.
तर, १३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान गृहभेटीद्वारे राहिलेल्या बाळांचे लसीकरण करण्यात येईल. या मोहिमेत बालकांना जवळच्या पोलिओ बुथवर जाऊन तोंडावाटे पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.