Corona-Patients
Corona-Patients

पुण्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने घटली; पण बळींचा आकडा दोनशेच्या घरात!

पुणे : पुण्यात सलग दोन दिवस दोनशेचा टप्पा ओलांडलेली कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.१८) मात्र निम्म्याने कमी झाली. सोमवारी दिवसभरात १०२ नवे सापडले आहेत. ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, विविध रुग्णालयांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्यांची संख्या दोनशेच्या घरात पोचली आहे. गंभीर बाब म्हणजे, २० वर्षांच्या एका तरूणीचा बळी गेला आहे.

दरम्यान, विविध रुग्णालयांतील १४८ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. सध्या विविध रुग्णालयांत १५९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या दोन दिवसांत रुग्ण वाढीचा वेग पाहता नव्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडण्याची भीती आहे. तर दिवसभरात १०२ रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे.

पुण्यात आतापर्यंत सुमारे ३२,२३६ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३५९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. मात्र, त्यातील १९९ रुग्ण मरण पावले आहेत; तर १८०० रूगण कोरोनामुक्त झाल्याने ते आपापल्या घरी गेले आहे. त्याशिवाय, १४८ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

दिवसभरातील पाच मृतांमध्ये हडपसरमधील २० वर्षाच्या महिलेचाही समावेश आहे. या महिलेची नुकतीच प्रसुती झाली होती, तिचे बाळ निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. मात्र, तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. प्रसुतीनंतर तिला त्रास होत असल्याने महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. या महिलेला अन्य आजार होते, त्यात तिला कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाला रोखण्यासाठी रोज सरासरी दीड हजार नागरिकांची तपासणी केली जात असून, या पुढे रोज़ ५ हज़ार जणांची त्तपासणी करण्याचे नियोजन आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी स्पष्ट केले.

रुग्ण संपर्कातील लोकांचे स्वॅब घेऊन त्यांच्यावर पुढचे उपाचर करण्यात येत आहे. तर, घरोघरी जाऊनही नागरिकांची तपासणी होत आहे. रूग्ण आणि संशयितांसाठी महापालिका, खासगी हॉस्पिटलमधील सेवा-सुविधा विस्तारण्यात आल्या आहेत. संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्यात आल्याने निगेटिव्ह असलेल्यांना विलग ठेवण्याची व्यवस्था झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

कोरोनाला थोपविण्यासाठी महापालिकेच्या पातळ्यांवर उपाय सुरू असले तरी, रोज नव्या कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रोज दोनशेहून अधिक रुण वाढत आहे. त्यामुळे महापालिका आणि पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये सवलती देत, काही दुकाने उघडली जात आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्याची चिन्हे आहेत. मात्र, रुग्ण कमी करतानाच बरे होणान्यांचे प्रमाण हे आशादायी चित्र असल्याचे महापालिका सांगत आहे.

गायकवाड म्हणाले, "शहरातील व्यवहार सुरू करताना लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. दुसरीकड़े पोलिसांच्या माध्यमातून रस्त्यांवर बॅरिकेडस लावले आहेत."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com