पुणे : दिवसभरात २४७ नवे कोरोना रुग्ण; रुग्णांच्या संख्येत वाढ

पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
corona
coronasakal

पुणे ः पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१०) दिवसभरात २४७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील ८३ नवे रुग्ण आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि पुणे शहरातील गंभीर रुग्णांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही एक हजारांच्या आत आली होती. ती संख्या बुधवारी १ हजार २१३ वर गेली आहे. शिवाय पुणे शहरातील गंभीर कोरोना रुग्णांची संख्या ९३ झाली होती. त्यात वाढ होऊन, ती आता ११५ वर गेली आहे.

corona
ENG vs NZ : नंबर वन इंग्लंडला नमवत न्यूझीलंडनं गाठली फायनल

दिवसातील एकूण नवीन रुग्णांत शहरातील ८३ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ४८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १०२, नगरपालिका हद्दीतील ९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच रुग्ण आहेत. दरम्यान, दिवसभरात २५९ जण कोरोनामुक्त झाले असून, अन्य पाच रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ७१, पिंपरी चिंचवडमधील ४४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १२४,नगरपालिका हद्दीतील १७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com