पुण्यात एका तासात ४५ मिमी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kothrud Rain

मुख्य शहरासह शिवाजीनगर आणि पाषाण परिसरात दुपारी चारच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली.

पुण्यात एका तासात ४५ मिमी पाऊस

पुणे - सकाळपासूनच शहरात ऊन सावलीचा खेळ चालू होता. त्यामुळे वाढलेल्या तापमानाचा परिणाम वातावरणातील उकाड्यावरही झाला. मात्र, दुपारी चारनंतर या उकाड्यातून पुणेकरांची सुटका होत. एका तासातच शहरात तब्बल ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुख्य शहरासह शिवाजीनगर आणि पाषाण परिसरात दुपारी चारच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. एका तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे चालकांना वाहणे चालविणे कठीण झाले होते. शहरात इतरही उपनगरांत याच काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. राज्यात सध्या मॉन्सून सक्रिय असून, पुढील काही दिवसांत त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तापमानामुळे पावसाला ब्रेक लागत, मुसळधार पावसाची शक्यता कमी झाली आहे. पुण्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रातच पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहील.

शहरातील पाऊस, सकाळी ८-३० ते संध्या. ६ वाजेपर्यंत (मिमी) -

  • शिवाजीनगर - ४५.६

  • पाषाण - ४५.६

  • लवळे - ०.६

  • लोहगाव आणि चिंचवड - ००

  • मगरपट्टा - १.५

Web Title: Pune 45 Milimeter Rain In Pune City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punerain
go to top