Pune : जुन्नर बाजार समितीसाठी ९७.६१ टक्के मतदान; रात्री आठ वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार

दोन्ही पॅनेलने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. मताला पाच हजार ते वीस हजार रुपयांचा भाव फुटला होता. बहुसंख्य मतदार स्वतः पैसे मागत असल्याने सहकाराच्या निवडणुकीत पाकीट संस्कृती फोफावली असल्याचे चित्र दिसत आहे.
pune
punesakal
Updated on

नारायणगाव - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी आज (दि. ३०) उत्साहात मतदान झाले. एकूण ३ हजार २६४ मतदारांपैकी ३ हजार १८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण ९७.६१ टक्के मतदान झाले. नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. आज सायंकाळी साडेचार ते आठ या वेळेत जुन्नर येथे मतमोजणी होईल. त्या नंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आमदार अतुल बेनके ,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर , माजी सभापती व पॅनल प्रमुख काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेर सहकार पॅनेल तर

भाजप नेत्या आशा बुचके, माजी आमदार शरद सोनवणे , माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी परिवर्तन पॅनेल तयार करण्यात आला होता. संचालकांच्या १८ जागांसाठी पाच अपक्षांसह ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

pune
Dhule Pune Bus : या तारखेपासून धुळेकरांसाठी धुळे-पुणे नॉनस्टॉप बस

दोन्ही पॅनेलने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. मताला पाच हजार ते वीस हजार रुपयांचा भाव फुटला होता. बहुसंख्य मतदार स्वतः पैसे मागत असल्याने सहकाराच्या निवडणुकीत पाकीट संस्कृती फोफावली असल्याचे चित्र दिसत आहे.दोन्ही पॅनेल प्रमुखांनी विजयाचा दावा केला असल्याने निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

आज सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत एकूण १७ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले.जुन्नर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे ९५६, ग्रामपंचायतीचे ११०४, व्यापारी गटातून १०२६, हमाल मापाडी गटातून १७८, असे एकूण ३२६४ मतदार होते. या पैकी ३ हजार १८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण ९७.६१ टक्के मतदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com