Pune News : तब्बल १० वर्षांनी रक्त संक्रमणातून मिळाले ‘अभय’

अभयला अगदी सहा महिन्यांचा असल्यापासून रक्त द्यावे लागायचे.
thalassemia sickness
thalassemia sicknesssakal

पुणे - अभयला अगदी सहा महिन्यांचा असल्यापासून रक्त द्यावे लागायचे. कारण त्याला थॅलेसेमियाचे निदान झाले होते. वयाच्या दहा वर्षांपर्यंत दर महिन्याला त्याला रक्त भरण्यासाठी जावे लागत. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. पण, त्याला यश आले नाही.

अखेर अभयला लहान भाऊ झाला. त्याचा बोन मॅरो अभयमध्ये प्रत्यारोपित करण्याची अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि दहा वर्षांनंतर दर महिन्याला रक्त देण्याच्या त्रासातून अभयची सुटका झाली.

अभयला लहान असताना त्याला सारखी सर्दी होत. फॅमिली डॉक्टरांनी त्याचे रक्त तपासण्याचा सल्ला दिला. तीन दिवसांनंतर झालेल्या निदानात अभयला थॅलेसेमिया आजार असल्याचे सांगितले. तेव्हा थॅलेसेमिया म्हणजे काय, असा पहिला प्रश्न आम्ही डॉक्टरांना विचारला. अभयचे वडील अमोल जगताप यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, 'या प्रश्नाला उत्तर देताना अभयला दर महिन्याला रक्त द्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तेव्हापासून रक्त संक्रमणाच्या चक्रात अभय अडकला होता. अभय अडीच वर्षांचा असल्यापासून हेमॅटोलॉजिस्ट डॉ. विजय रमणन उपचार करत आहे. सुरवातीला नियमित रक्त संक्रमण करावे लागत होते. त्यासाठी औषधांचाही एक प्रयोग करण्यात आला. त्यामुळे सहा महिने रक्त संक्रमण करावे लागले नाही.

पण, त्यानंतर परत रक्त संक्रमणाशिवाय पर्याय राहिला नाही. अशा वेळी बोन मॅरो हा शेवटचा उपाय ठरतो, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, अभयच्या आईचे बोन मॅरो जुळले नाही. या दरम्यान त्याला पृथ्वी हा लहान भाऊ झाला. तो सात वर्षांचा झाल्यानंतर त्याचा बोन मॅरो अभयशी जुळला.'

रुबी हॉल क्लिनिकमधील हेमॅटोलॉजिस्ट डॉ. विजय रमणन म्हणाले, 'बोन मॅरो जुळला पण, त्याच दरम्यान कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करता आली नाही. या दरम्यान अभय दहा वर्षांचा झाला होता. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर अभयवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यामुळे आता रक्तसंक्रमण करण्याची गरज लागणार नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com