
latestr Pune news: भरधाव दुचाकी घसरून आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॉल रस्त्यावरील लाइफ स्टाइल मॉलसमोर घडली. मागील आठवड्यात एरंडवणे परिसरात दुचाकी घसरून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
अर्पित शर्मा (वय २२, रा. रविराज सोसायटी, कोरेगाव पार्क) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी मित्र रोहित शर्मा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिस अंमलदार दत्तात्रेय सूळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.