
Biker Dies After Being Hit by Container, Crushed by Tractor in Pune
Sakal
पुणे : भरधाव कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडल्याने एकाचा मृत्यू झाला. फुलगाव ते आळंदी रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर कंटेनर चालक आणि ट्रॅक्टर चालक पसार झाले असून, त्यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.