Latest Pune News: भरधाव स्कोडा मोटारीने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याची घटना कोंढवा परिसरातील खडी मशिन चौकात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. .या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी मोटारचालक संतोष गुप्ता याला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता हा मोटार मेकॅनिक आहे. त्याने भरधाव मोटार चालवून दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. .या अपघातात दुचाकीस्वारांच्या हाताला जखम झाली आहे. गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, मोटारचालकाने मद्यसेवन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोटारीचा टायर फुटला असून, स्थानिकांनी मोटारचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापूर्वी मोटारचालकाला नागरिकांनी चोप दिला.----- .भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, दोघे जखमीदरम्यान, डी. पी. रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी भरधाव मोटारीने इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर तरुण-तरुणी जखमी झाले. तरुणीच्या पायाला दुखापत झाली असून, अपघातानंतर मोटारचालक गाडी घटनास्थळीच सोडून पसार झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.