
Pune News: पुण्यातल्या जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण कार अपघात झाला आहे. स्वीफ्ट आणि पीकअपची धडक झाली. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना रात्री ८ वाजून १५ मिनिटांच्या आसपास घडली. मृतांशिवाय पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.