
Pune : AFCAT चे प्रवेशपत्र शुक्रवारपासून करता येणार डाऊनलोड
पुणे : भारतीय हवाईदलातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट’च्या (एएफकॅट) प्रक्रिये अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना शुक्रवारपासून (ता. १०) डाऊनलोड करता येणार आहेत. हे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर सकाळी अकरानंतर उपलब्ध होणार आहे.
हवाईदलातर्फे वर्षातून दोन वेळा एएफकॅट ही प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जाते. ही प्रक्रिया महिला व पुरुष उमेदवारांसाठी असून याची लेखी परीक्षा येत्या २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान देशातील विविध केंद्रांमध्ये पार पडणार आहे.
यासाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात येत असून हे प्रवेशपत्र उमेदवारांना परीक्षेच्या तारखेपर्यंत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राची एक प्रत, एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि त्याचबरोबर एक ओळखपत्र (अर्ज भरताना वापरलेलेच कागदपत्रे व फोटो) सोबत बाळगणे आवश्यक आहे. यासाठी हवाईदलाच्या afcat.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर उमेदवारांना करात येईल.
एएफकॅट प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ः
- हवाईदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करा
- ‘करिअर’ या विकल्पावर जाऊन प्रवेशपत्राची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा
- एएफकॅट लॉगिन युझरनेम, पासवर्ड व सुरक्षा कोड भरा
- त्यानंतर प्रवेशपत्र दिसेल
- या प्रवेशपत्रात असलेले नाव, नोंदणी क्रमांक, परीक्षा केंद्र आदी सर्व तपशिलांची पाहणी करा
- तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करा
महत्त्वाचे जर उमेदवाराच्या प्रवेशपत्रात तपशील चुकीचा असेल, प्रवेशपत्र डाऊनलोड होत नसेल किंवा उमेदवाराला प्रवेशपत्र त्यांच्या नोंदणीकृत इमले आयडीद्वारे प्राप्त झाले नाही तर त्यांनी पुण्याच्या सी-डॅक येथील एएफकॅट क्वेरी सेलकडून त्वरित चौकशी करावी.