तालिबानी राज्यात जगू शकत नाही, अफगाणी विद्यार्थ्यांना राहायचंय पुण्यात

तालिबानी राज्यात जगू शकत नाही, अफगाणी विद्यार्थ्यांना राहायचंय पुण्यात

पुणे : पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांना अफगाणिस्थानवर तालीबानींनी कब्जा केल्यानंतर पुन्हा त्यांच्या देशात जायचे नाही, त्यांना भारतामध्ये राहायचे आहे. परिस्थिती आणखी चिघळली तर भारतातील वास्तव्याबाबत अफगाणी विद्यार्थी चिंतेत आहे. वर्षअखेरीस या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपेल.

तालिबानी राज्यात जगू शकत नाही, अफगाणी विद्यार्थ्यांना राहायचंय पुण्यात
तालिबान विरोधात लोक रस्त्यावर उतरले, जलालाबादमध्ये गोळीबार

अफगाणी विद्यार्थी होमैन बथूर बाथूर,''मला जेव्हा समजले की, तालिबान्यानी 15 प्रांतावर कब्जा केल्याचे समजले तेव्हा मी भारतात परत माघारी आलो. माझ्या कुटुंबाशी बोलून आता महिना झाला आहे. मला तर आत्महत्या करावीशी वाटत होती. मी संयुक्‍त राष्‍ट्र शरणार्थी उच्‍चायुक्‍त कार्यालयात (UNHCR) निर्वासित म्हणून अर्ज केला आहे. मी पुन्हा परत जाऊन तालिबानांच्या राज्यात राहू इच्छित नाही.

अफगाणी विद्यार्थी मुज्जमिल सबरी म्हणाला, अमेरिका मदत करण असल्याचे दाखवत आहे पण सत्य वेगळे आहे. जे अफगाण सरकारसाठी काम करत होते त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. कमर्शिअल फ्लाईट बॅन केल्या आहेत. मला माझ्या कुटुंबाकडे परत जायचे आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहायचं आहे पण सध्याच्या स्थिती ही खूप धोकादायक आहे.

तालिबानी राज्यात जगू शकत नाही, अफगाणी विद्यार्थ्यांना राहायचंय पुण्यात
काय असतो Emergency Visa ? 'अफगाण'मधील लोक असा घेऊ शकतात फायदा

अफगाणी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन

अफगाणिस्तानमधील बदलती राजकीय स्थिती पाहता, राज्यासह देशातील अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या त्यांना मानसिक समस्यांबरोबरच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी सरहद संस्थेच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजीव नहार यांनी दिली आहे. अफगाणी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सरहदच्या वतीने आवश्यक ती मदत पुरविण्यात येणार आहे. तसेच गरजू अफगाणी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात कामही मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे नहार यांनी सांगितले. अफगाणी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी 8007066900 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com