Pune News: राज्यात कृषी विज्ञान केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी ; राधाकृष्ण विखे पाटील

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव २०२३
 Radhakrishna Vikhe Patil News
Radhakrishna Vikhe Patil Newssakal

नारायणगाव : शेतीच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे कृषी तंत्रज्ञान व संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) करतात. राज्यात कृषी विज्ञान केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे.

कर्ज काढून ,पोटाला चिमटा घेऊन, नैसर्गिक आपत्तीचा, बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी शेती उत्पन्न घेत आहेत.घाम गळणारा शेतकरी हाच शेतीतील खरा शास्त्रज्ञ आहे. असे मत महसूल, पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव २०२३ ,पीक प्रात्यक्षिके ,कृषी प्रदर्शन व पिक परिसंवादाचे उदघाटन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे शेतकरी, कृषी सहाय्यक यांचा सत्कार व केव्हीकेचे शास्त्रज्ञ राहुल घाडगे ,

निवेदिता शेटे लिखित पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व व प्रक्रिया या पुस्तकाचे प्रकाशन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहर होते. या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे , डॉ.लाखन सिंग,भाजप नेत्या अशा बुचके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे,

कार्यवाह रवींद्र पारगावकर , उपाध्यक्ष सुजित खैरे , डॉ.आनंद कुलकर्णी, संचालक शशिकांत वाजगे ,डॉ. संदीप डोळे ,डि.के.भुजबळ एकनाथ शेटे, रत्नदीप भरवीरकर,आत्म्याच्या प्रकल्प उपसंचालक पुनम खटावकर, जिल्हा अधीक्षक अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, विकास अधिकारी डॉ.अनिल देशमुख,तहसीलदार रवींद्र सबनीस आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले नारायणगाव केव्हीकेचे काम चांगले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीत केव्हीकेचे मोठे योगदान आहे.मात्र शेतीशी संबंध नसणारे कृषी विभागाच्या सेवेत असणारे काही कृषी अधिकारी व कृषी सहायक शेतकऱ्यांना सल्ला देण्याचे काम करतात हे दुर्दैव आहे. लाभार्थी उद्दिष्ट गाठणे,आर्थिक तरतूद खर्च करणे याशिवाय दुसरे काम कृषी कर्मचारी करत नाहीत.

अशी बोचरी टीका करून विखे पाटील पुढे म्हणाले देशात रोजगार देणारी मोठी व्यवस्था शेती व्यवसाय आहे. तरुणांमध्ये शेतीबाबत नैराश्य आहे.शेतीला चांगले दिवस येण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणे आवश्यक आहे.

फार्मर प्रोड्युसर कंपन्याच्या माध्यमातून शेतीत परिवर्तन होऊ शकते. मार्केटिंग व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे .लोकांना विषमुक्त, सेंद्रिय फळे ,भाजीपाला हवा आहे.

रासायनिक खते, कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे शेतीत काम करणाऱ्या महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे .

जैविक खतांचा वापर व तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे ,राज्य शासनाच्या कृषी विभाग केवळ शासकीय योजना राबवन्याचे काम करत आहे. जैविक खते औषधांच्या वापर वाढवण्यासाठी त्यांनी काम करणे आवश्यक आहे.

केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर म्हणाले उत्पादन खर्च कमी उत्पादन वाढ करणे, शेती विकास, रोजगार निर्मिती, दुग्ध व्यवस्थापन, संगोपन , दूध वाढ ,शेतीमालाला योग्य भाव, साठवणूक, विपणन व्यवस्था, शेती उद्योग याबाबतचे काम कृषी विज्ञान केंद्र करत आहे.

या मुळे शेती व्यवस्थेत बदल झाला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट व सर्पदंश समस्या वाढली आहे.

शासनाने शेतीला रात्रीचा ऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा. अशी मागणी यावेळी मेहेर यांनी केली.

●आमदार बेनके म्हणाले शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खते, बियाणे ,औषधे ,अवजारे आदी जीएसटी मुक्त होणे आवश्यक आहे.या साठी शासनाने प्रयत्न करावा.

●खासदार आढळराव पाटील म्हणाले नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र देशपातळीवर अग्रेसर आहे.शेती क्षेत्रात भरीव संशोधनाची गरज आहे. सिंचन, हमीभाव हे शेतकऱ्यांचे अनेक वर्षाचे दुखणे आहे.

सरकार येते, जाते मात्र हे प्रश्न सुटत नाहीत.शेती उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. यासाठी चळवळ उभी करावी लागेल.

सूत्रसंचालन सुनील ढवळे, मेहबूब काझी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन केव्हीकेचे प्रमुख डॉ.प्रशांत शेटे , प्रा.राहुल घाडगे,धनेश पडवळ यांनी केले. आभार कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com